डॉ. महेश गुरव : स्वच्छ भारत सर्व्हेक्षण स्पर्धेत लोकसहभाग महत्वाचा

वडूज – वडूज शहर स्वच्छ भारत सर्व्हेक्षण 2019 स्पर्धेत उतरले असून ही स्पर्धा 1 डिसेंबर पासून ते 31 डिसेंबरपर्यंत असणार आहे. यामध्ये लोकसहभागातून काम करून वडूज शहर स्वच्छ व सुंदर करण्यास प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव यांनी केले.

येथील नगरपंचायतीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, शहर स्वच्छता समन्वयक रुचिरा खंडारे, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, संदीप गोडसे, प्रदीप खुडे, वचन शहा, अभय देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

-Ads-

गुरव म्हणाले की, स्वच्छतेची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी. यासाठी जेष्ठ नागरिक, युवक, युवती, महिला आदींची यासंदर्भात बैठक लावणार असून प्रत्येक प्रभागातील स्वच्छतेसाठी अनुक्रमे 1 ते 5 अशी बक्षिसे नगरपंचायतीतर्फे देण्यात येणार आहेत. अनेक साथीच्या आजारांना नकळत आपण स्वतःच जबाबदार असतो.

या आजारापासून दूर राहण्यासाठी आपला स्वच्छ सुंदर परिसर ठेवण्यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहभागी होऊन आपले शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची गरज आहे. यासाठी महिला मंडळ, सेवाभावी संस्था, विविध सामाजिक संस्था, आजी माजी पदाधिकारी, युवक, युवती, महिला, जेष्ठ नागरिक यांचा मेळावा घेणार असून स्वच्छतेबाबतीत जनजागृती केली जाणार आहे. रोज किमान एक तास प्रत्येकाने यासाठी दिला पाहिजे. त्याचबरोबर स्वच्छतेच्या संदभरत जनजागृती करून शहर स्वच्छ व सुंदर करण्यास सर्वांनी सहभाग घ्यावा.

तसेच शहरात पार्किंग व्यवस्थेचा प्रश्‍न आहे. तो प्रश्‍न काही दिवसात मार्गी लावणार आहे. कचरा निर्मूलनासाठी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तात्पुरता प्रश्‍न मार्गी लावणार आहे, असे ही ते म्हणाले. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी स्वच्छ भारत सर्व्हेक्षण स्पर्धेबाबत माहिती सांगितली. यावेळी सचिन माळी, जयवंत पाटील, अमोल वाघमारे, सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)