डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार

उरुळी कांचन- महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्यातील दिशादर्शक कामकाज करणाऱ्या सहकारी पतसंस्थांना सन 2017 ते 18 या आर्थिक वर्षाकरीता दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार सलग तीन वेळा पुणे विभागातून 26 सप्टेंबर रोजी लोणावळा येथे विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान केला. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांसह संचालक उपस्थित होते. यावेळी काका कोयटे यांनी सांगितले, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कामकाज उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. पुरस्कार स्वीकारणेसाठी संस्थेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक शरद वनारसे, भाऊसाहेब कांचन, जनार्दन गोते, सहाय्यक मुख्यव्यव्स्थापक अजय पवार आदी उपस्थित होते.
संस्थेचे यंदाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. संस्थेच्या 8 शाखा पुणे जिल्ह्यात कार्यरत असून त्यापैकी 3 शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत आहेत. संस्थेचे वसूल भाग भांडवल 5 कोटी 42 लाख असून, ठेवी 161 कोटी, कर्जवाटप 116 कोटी आणि गुंतवणूक 60 कोटी रुपयांची आहे. संस्थेला सतत ऑडीट वर्ग “अ’ मिळाला असून यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)