डॉ. भा. पां. हिवाळे संस्थेच्या आयएमएसमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन

नगर – “सामाजिक जाणीवेतून रोजच्या दैनंदिन कार्याबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व सामाजिक समस्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली पाहिजे. त्याचबरोबर विविध खेळात, स्पर्धात सहभाग घेऊन स्वत:च्या व इतरांच्या कलागुणांचा विकास करून नवी आव्हाने स्वीकारली पाहिजे,’ असे मत डॉ. भा. पां. हिवाळे संस्थेचे खजिनदार डॉ. मोहन थोलार यांनी व्यक्त केले.

डॉ. भा. पां. हिवाळे संस्थेच्या आयएमएसमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व विविध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ डॉ. मोहन थोलार यांच्या हस्ते झाला; यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आयएमएसचे संचालक डॉ. एम. बी. मेहता, व्यवस्थापन विभागाच्या डॉ. मीरा कुलकर्णी, संगणक विभागाचे डॉ. उदय नगरकर, प्रा. डॉ. विक्रम बार्नबस, ग्रंथपाल स्वाती बार्नबस, प्रा. डी. ए. कुलकर्णी उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. एम. बी. मेहता म्हणाले की, ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी खेळ, सांस्कृतिक स्पर्धा घेऊन विजेते तसेच शैक्षणिक गुणवंतांचा गुणगौरव, सत्कार करून प्रेरणा मिळावी यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत महत्त्वाचे ठरते. सर्व सहभागी विद्यार्थी व विजेत्यांचे यानिमित्त त्यांनी अभिनंदन केले.
मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे देण्यात आली. सांघिक करंडक एम.बी.ए. प्रथम वर्षाच्या अल्फा तुकडीच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी मध्यान व दर्शना जॉय यांनी केले. यावेळी आयएमएसचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)