डॉ. बाबासाहेब आंबेडकर चिंतन परिषद उत्साहात

लोणंद ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर चिंतन परिषदेत सहभागी झालेले डॉ. रजिया पटेल, शाहीर संभाजी भगत आदी मान्यवर.

डॉ. रजिया पटेल, शाहिर संभाजी भगत यांची प्रमुख उपस्थिती

लोणंद, दि. 1 (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर आणि खंडाळा तसेच सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज चिंतन परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन हे साहित्यिक क्षेत्रातील डॉ. रजिया पटेल, शाहिर संभाजी भगत, डॉ. तुकाराम रोंगटे, उपप्राचार्य प्रकाश पवार, प्राचार्य सुरेश खराते, सरपंच वंदना कडाळे, आनिष शशुद्दीन खान, प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, पंकज धिवार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
समाज चिंतन परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अल्पसंख्याक, आदिवासी समाज, मातंग समाज, चर्मकार समाज, ओबीसी समाज भटके विमुक्त समाज तसेच भारतीय संविधान आणि सध्याची सामाजिक स्थिती आदि विषयांवर विचार मंथन करणारी भाषणे ही वेगवेगळ्या वक्‍ते यांच्याकडून करण्यात आली. तसेच आंबेडकरी समाज चिंतन आणि चिकित्सा या लिहीलेल्या डॉ. रोहिदास जाधव, पंकज धिवार, महादेव कांबळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
उद्‌घाटन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अल्पसंख्यांक या विषयावर बोलताना डॉ. रजिया पटेल म्हणाल्या, की मुस्लिम लोक ही या देशाचे नागरिक आहेत. आज ही मुस्लिम लोकांना नक्षली म्हटले जात आहे, देशाच्या उभारणीत मुस्लिम समाजाचेही योगदान आहे. देशाच्या एकतेसाठी त्यांच्याकड़े पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलायला हवा.
यावेळी शाहीर संभाजी भगत म्हणाले की, आपली चळवळ ही विघटनाच्या दिशेने जात आहे. जोपर्यंत आपण योग्य संघटन करायला शिकणार नाही तोपर्यंत जो उभारलेला लढ़ा आहे तोपर्यंत त्यामध्ये यश मिळणार नाही.
तुकाराम रोंगटे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनीतून उदयास आलेल्या भारतीय संविधानामुळेच आजचा आदिवासी समाज हा जंगलातून बाहेर पडून हातात पेन घेऊन शिक्षण घेतो आहे.
मातंग समाजाच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील विविध भागांतून मातंग परिषदा घेतल्याचे डॉ. शरद गायकवाड़ यांनी सांगितले.
जेष्ठ विचारवंत श्रावण देवरे, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. नारायण भोसले, रतनलाल सोनग्रा यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुजाता भालेराव, छाया जावळे यांनी केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)