डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन

कुरवली- येथील कर्मयोगी शंकरराव पाटील माध्यमिक विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक संतोष कदम होते. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्युनिअर विभागाचे प्राध्यापक संदिप पवार यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. कार्यक्रमात बाळासाहेब मोरे, बापुराव कदम, अंबादास कांबळे, सविता मारकड, रोहिणी रिटे, उमा मोरे समवेत शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल कणसे यांनी तर महेमूद मुलाणी यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)