डॉ. बाबाबसाहेबांमुळेच सर्वांना अधिकार

दौंड – सामान्य नागरिकांना आनंदाने जगू दिले पाहिजे आणि म्हणूनच शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना जे अधिकार मिळाले आहेत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळेच मिळालेले आहेत. परंतु तरीही आम्ही कायद्याच्या कक्षेत राहूनच काम करणार आहोत. कायदा मोडणारा हा राष्ट्रपुरुषांचा अनुयायी असूच शकत नाही, असे परखड मत पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजीमहाराज जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलिसांनी आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत हक बोलत होते. राष्ट्रपुरुषांच्या जयंती उत्सवाचा आनंद सर्वांनाच घेता यावा. यासाठी उत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना सूचना आणि मार्गदर्शन व्हावे. या उद्देशाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी, पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश मोरे, परीक्षाविधिन पोलीस अधिकारी सौरभ अग्रवाल, दौंडचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात तसेच शहर व तालुक्‍यातील सर्व पक्ष संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)