डॉ. प्राजक्ता जाधव हिला संगीतरत्न पुरस्कार

नायगाव-किल्ले पुरंदर (ता. पुरंदर) येथे छत्रपती संभाजीमहाराज जयंती सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा छत्रपती संभाजीराजे भोसले व सद्‌गरू नारायण महाराज, मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात गुरोळीची (ता. पुरंदर) गोड गळ्याची गायिका डॉ. प्राजक्ता रवींद्र जाधव हिला संगीतरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांचे हस्ते गौरवण्यात आले. संगीतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राजक्ताचे अभिनंदन पुरंदर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटणे, पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, बाळासो भिंताडे, लक्ष्मण बोरकर, शिक्षक समितीचे अध्यक्ष अरुण महाडीक, तानाजी फडतरे, संदीप जगताप, सुनिल लोणकर, राजेंद्र कुंजीर, प्रदीप कुंजीर, बाळासाहेब फडतरे, अनिल कुंजीर, भाऊसो कुंजीर, तानाजी रिठे स्वरसाधना शिक्षक भजनी मंडळ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)