डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक टेबल टेनिस स्पर्धेला सुरूवात 

सनत बोकील आणि ईशा जोशीला अग्रमानांकन 
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष व महिला गटात अनुक्रमे सनत बोकील आणि ईशा जोशीला अग्रमानांकन देण्यात आले असून सदर स्पर्धेला सोमवार दि. 20 ऑगस्ट पासून पासून सुरूवात होणार आहे.
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने पीवायसी क्‍लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होत आहे.
यांत दीपेश अभ्यंकर, शौनक शिंदे, पृथा वर्टिकर, अनिहा डिसूझा, नील मुळ्ये, देवयानी कुलकर्णी, स्वरूप भादलकर, नभा किरकोळेलाही प्रथम मानांकन देण्यात आले आहे. या स्पर्धेत तेरा गटांत मिळून एकूण 537 प्रवेशिका आल्या आहेत.
या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 80हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच, सर्वोत्कृष्ट खेळाडूला करंडक देण्यात येणार आहे. या स्पर्धेतून म्हाळुंगे, बालेवाडी येथे 9 ते 16 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 49 व्या आंतरजिल्हा व 80 व्या राज्य अजिंक्‍यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे.
या प्रमुख स्पर्धेबरोबरच 25 व 26 ऑगस्ट रोजी डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक प्रौढ गटाची राज्य मानांकन स्पर्धाही होत आहे. ही स्पर्धा 40, 50, 60, 65, 70 ,75 वर्षावरील पुरुष आणि 40, 50 व 60 वर्षावरील महिला गटात, तसेच सांघिक स्पर्धाही होत आहेत. अशी माहिती पीवायसी क्‍लबचे मानद सचिव कुमार ताम्हाणे व गिरीश करंबेळकर यांनी दिली.
या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून मधुकर लोणारे हे काम पाहणार आहेत. विद्या मुळ्ये, पीडीटीटीएचे सचिव श्रीराम कोणकर, अविनाश जोशी, उपेंद्र मुळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये गिरीश करंबेळकर, अविनाश जोशी, उपेंद्र मुळ्ये,दीपक हळदणकर, दीपेश अभ्यंकर, कपिल खरे यांचा समावेश आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)