डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण :काळे, दिगवेकर आणि बंगेरा यांना जामीन

सीबीआयने दोषारोपपत्र वेळेत दाखल न केल्याचा तिघांना फायदा

पुणे – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने डिफॉल्ट जामीन मंजुर केला आहे. सीबीआयने वेळेत म्हणजे 90 दिवसांच्या दोषारोपपत्र दाखल न केल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी हा आदेश दिला आहे. अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा अशी जामीन मिळालेल्या तिघांची नावे आहेत. त्यामुळे सीबीआय नामुष्कीची वेळ आली आहे.
बंगेरा आणि दिगवेकर यांना अटक होऊन तब्बल 101 दिवस, तर अमोल काळेला अटक होऊन 96 दिवसांचा कालावधी झाला होता. याप्रकरणात सीबीआयने बेकायदेशिर प्रतिबंधक हालचाली अन्वये कलम वाढ केली आहे. या कायद्यान्वये दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाकडून 180 दिवसांपर्यंत वाढ मिळू शकते. त्यामुळे दाभोलकराचे शुटर असलेले आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयने यापूर्वीच 45 दिवसांची मुदतवाढ मिळवली होती. परंतु, काळे, बंगेरा आणि दिगवेकर यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयने वेळेत मुदत वाढीचा अर्ज दाखल केला नाही. याचाच फायदा बचाव पक्षाने घेतला. 90 दिवसांची कालवधी उलटून गेल्याने तिघांना जामीन मिळण्याचा अधिकार असल्याने बुधवारी ऍड. धर्मराज चंडेल यांनी अर्ज दाखल केला होता. गुरूवारी त्यांनी युक्तीवाद करताना तिघांना जामीन मिळण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाला सांगितले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

खंडेलवाल, नागोरी यांनाही मिळाला होता जामीन
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दहशतवाद विरोधा पथकाने (एटीएस) कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील विकास खंडेलवाल, मनिष नागोरी या दोघांना अटक केली आहे. वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने त्या दोघांनाही जामीन मिळाला आहे. त्यानंतर मोठा कालावधी उलटला तरीही, दोघांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही. दोघांना खटल्यातून वगळण्यातही आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर बचाव पक्षातर्फे ऍड. बी.ए. आलुर यांनी दोघांना वगळण्यासाठी येथील न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर अद्याप सुनावणी झाली नसल्याचे ऍड. आलुर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)