डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयला आणखी 45 दिवसांची मुदत

पुणे – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) आणखी 45 दिवसांची मुदत न्यायालयाने दिली आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे, शरद कळसकर, राजेश बंगेरा, अमोल काळे, अमित दिगवेकर यांना अटक केली होती. या सर्वांवर बेकायदा प्रतिबंधक हालचालींचे कलम (युएपीए) वाढविले होते. दरम्यान, गुन्ह्याच्या तपास करण्यासाठी अंदुरे, कळसकर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयने 45 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ती मंजूर करत मुदतवाढ दिली होती. मात्र, सीबीआयने बंगेरा, काळे, दिगवेकर यांच्या विरुद्ध वेळेमध्ये दोषारोपपत्र दाखल न केल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी तिघांचा डिफॉल्ट जामीन मंजूर केला होता.

तिघांचा जामीन मंजूर झालेल्याने सीबीआयने सावध पवित्रा घेत अंदुरे, कळसकर यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने दिलेली मुदतवाढ संपण्याच्या आत पुन्हा 45 दिवसांची मुदतवाढ मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)