डॉ. दाभोलकर हत्याप्रकरण : गुन्हा दाखल करण्यासाठी तीन महिने द्या

 सीबीआय सरकारी वकिलांचा दावा

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या चौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात त्यांच्यावर बेकायदा हालचाली प्रतिबंध कायद्यानुसार (यूएपीए) नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी आणखी 90 दिवसांचा कालावधी देण्यात यावा, असा युक्तीवाद सीबीआयच्या सरकारी वकिलांनी गुरुवारी न्यायालयात केला.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी (दि. 16) याप्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात यूएपीए अॅक्‍ट लावण्यासाठी आणखी मुदत देण्यात या मागणीसाठी सीबीआयने न्यायालयात अर्ज केला आहे. यावर सीबीआयचे वकील पी. राजू यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, “सनातन संस्थेचे दैनिक सनातन प्रभात हे जनजागृतीसाठी वृत्तपत्र आहे. त्यामध्ये हिरण्य कश्‍यकप राक्षसाचा वध करण्यात येतो आहे, अस चित्र प्रसिद्ध करण्यात आला होते. त्याचा संदर्भ अंनिस बरोबर जोडण्यात आला होता. याप्रकरणातील अटक आरोपी विनोद तावडे यांचे काही इ-मेल मिळाले असून फरार असलेला आरोपी सारंग अकोलकर याच्यांशी त्याने संवाद केल्याचे स्पष्ट झाले आहे. गौरी लंकेश प्रकरणात एसआयटीने अमोल काळे याला अटक केली आहे, त्याच्याकडे एक डायरी मिळाली असून ज्यामध्ये 36 जणांची नावे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना मारण्याचा कट होता. आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या चौघांची हत्या केली. अमोल काळे याच्या डायरीमध्ये ज्या 36 लोकांची नावे आहेत. त्यांना नुकतेच पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. आरोपींनी मोठा कट रचला असून तो एका दिवसात नाही तर त्यासाठी त्यांनी भरपूर पूर्वतयारी केली आहे त्यामुळे प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी नव्वद दिवसांचा कालावधी मिळावा,’ अशी मागणी सीबीआयचे सरकारी वकील पी. राजू यांनी केली.

सचिन अंदुरेतर्फे अॅड. संजीव पुनाळेकर यांनी बाजू मांडली. तसेच सरकार पक्षाच्या मागणीला विरोध केला. “दाभोलकर हत्या प्रकरणात विनय पवार आणि सारंग अकोलकर मारेकरी असल्याचे सीबीआयने सुरुवातीला सांगितले. सचिन अंदुरे तीन महिने आधीच अटक असून त्याच्याविरोधात पुरेसे पुरावे नाहीत. आणखी 90 दिवस त्याला अटकेत ठेवणे त्याच्यावर अन्याय आहे. तपास यंत्रणांनी तपासात काय प्रगती झाली याची कारणे सांगणे गरजेचे आहे,’ असे अॅड. पुनावळेकर म्हणाले.

सीबीआय संघाचे नाव घेत नाही
संघाच्या लोकांची नावे घेत घेतली जात नाही. गौरी लंकेश प्रकरणात तपासात ज्या बारा लोकांना अटक केली आहे. त्यातील सहा जणांनी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे जबाब दिले आहेत. मात्र, जाणीवपूर्वक ते संघाचे असल्याचे सांगितले जात नाही. सीबीआय सनातन, हिंदू जनजागृती समितीचे नाव घेते. मात्र, आरएसएसचे नाव घेत नाही, असे अॅड. पुनावळेकर यांनी कोर्टाला सांगितले.

शरद कळसकर केले व्हीसीद्वारे हजर
या प्रकरणातील आरोपी शरद कळसकररला मुंबई सेंट्रल जेलमधून व्हीसीद्वारे पुण्यातील हजर करण्यात आले. त्याला न्यायाधीशांनी काय सुनावणी सुरू आहे. त्याची बाजू कोण मांडणार आहे, याची माहिती दिली. कळसकर तर्फे त्याचे वकील अॅड. धर्मराज चंडेल शुक्रवारी बाजू मांडणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)