डॉ डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर

ओस्लो: कांगोतील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना सन 2018 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. संघर्षाच्या काळात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात त्यांनी दिलेल्या लढ्याबद्दल त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. युद्ध काळात महिलांचा हत्यारासारखा वापर करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात असल्याच्या विरोधात त्यांनी पुकारलेल्या लढ्याचा आम्हीं याद्वारे सन्मान केला आहे असे नोबेल समितीचे अध्यक्ष बेरीट रेईस ऍन्डरसन यांनी म्हटले आहे. ही एक जागतिक समस्या आहे. तिचे स्वरूपही अन्य समस्यांपेक्षा वेगळे आणि भीषण आहे. त्याचा विचारच फार जणांनी केलेला नाही असे त्यांनी म्हटले आहे.

पुरस्कार विजेत्यांपैकी नादिया या स्वत: बलात्काराच्या शिकार बनल्या होत्या तर डॉ मुकवेगे हे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. नादिया या मुळच्या इराकच्या असून त्या यजिदी जमातीच्या आहेत. त्यांचे आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने अपहरण करून त्यांच्यावर अनेकवेळा बलात्कार केला होता.

-Ads-

अतिरेक्‍यांच्या तावडीतून सुटून आल्यानंतर त्यांनी या प्रकाराच्या विरोधात जगभरात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे. नोबेल पुरस्कारासाठी यंदा एकूण 331 नावे आली होती. त्यात 216 व्यक्ती आणि 115 संस्थांचा समावेश होता. त्यातून नादिया आणि मुकवेगे यांच्या नावांवर नोबेल समितीने शिक्कामोर्तब केले. आत्तापर्यंत 104 व्यक्ती आणि 27 संघटनांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)