डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन

वडगाव मावळ, (वार्ताहर) – आंबी (ता. मावळ) येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर आंबी या महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांसाठी महाविद्यालयाने पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम आयोजित केला.
या प्रदर्शनात विविध विषयांवरील 6000 पुस्तके ठेवण्यात आली होती. सदरील पुस्तके विद्यार्थ्यांना स्वस्तात तसेच मापक दरात महाविद्यालयाने या प्रदर्शनात उपलब्ध करून दिले.

महाविद्यालयातील अश्‍विनी सीताराम मोहाडीकर व दिपायन सरकार या विद्यार्थिनीने फीत कापून प्रदर्शनाचे कार्यक्रमास उद्‌घाटन केले. प्रदर्शन हे सलग तीन दिवसांसाठी विद्यार्थी व पालकांसाठी खुले ठेवण्यात आले. या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहेत. या वेळी प्राचार्य डॉ. उमा जाधव, प्रा. अभिजित डे, प्रा. विजय पवार, प्रा. सीमा पाटील, प्रा. शिल्पा शिंपुकडे, प्रा. श्‍वेता भंडारी, प्रा. बिसवास बहुसंख्य प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)