डॉ. चंद्रकुमार नलगे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – आचार्य अत्रे यांच्या जन्मगाव सासवड येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फे प्रदान करण्यात येणारा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कर सुप्रसिध्द लेखक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार 13 जून रोजी सासवड येथे प्रदान करण्यात येणार आहे.

गेली अठ्ठावीस वर्षे हा पुरस्कार अनेक नामवंत साहित्यिकांना देण्यात आले आहेत. प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांना महाराष्ट्रातील अनेक शहरातील फोंडेशनचे, प्रतिष्ठीत असे 64 पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची 86 पुस्तके प्रकाशित झाली असून महाराष्ट्र शासनाचे 13 पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाचा आदर्श प्राध्यापक पुरस्कार लाभला आहे.

महाराष्ट्रभर गाजलेल्या “अंगाई’ चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. वाड्‌मय क्षेत्रातील एकाच ललित गद्य प्रकारातील चार पुस्तकांना शासनाचा ग्रंथपुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनानेच प्रा. नलगे यांची सात पुस्तके प्रकाशित केली आहेत. प्रा. नलगेनी शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)