डॉ. गोविंदाप्पा यांच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डूडल 

नवी दिल्ली – डॉक्टर गोविंदाप्पा वेंकटस्वामी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त गुगलने एक खास डूडल साकारले आहे. या डूडलमध्ये गोविंदाप्पा मध्यभागी दिसत असून त्यांच्या मागे हॉस्पिटल दिसत आहे. यामधील एक बाजू अंधुक तर दुसरी स्पष्ट दिसत आहे. डॉ.गोविंदाप्पा नेत्रचिकित्सक होते.

तामिळनाडूच्या वडमल्लापूरममध्ये १ ऑक्टोबर १९१८ रोजी जन्मलेले गोविंदाप्पा यांनी लाखो लोकांच्या डोळ्यांचे उपचार करत त्यांचे जीवन प्रकाशमय केले. चेन्नईच्या स्टॅनली मेडिकल कॉलेजमधून डिग्री घेऊन त्यांनी नेत्रविज्ञानमध्ये अभ्यास केला. अरविंद आय हॉस्पिटलचे डॉ. गोविंदाप्पा संस्थापक आहेत. कमी पैशात उच्चस्तरीय उपचार या हॉस्पिटलमध्ये केले जातात. अरविंद आय केअरने आतापर्यंत साडेपाच लाखांपेक्षा जास्त लोकांच्या डोळ्यांवर उपचार केले आहेत. डॉ. गोविंदाप्पा यांना त्यांच्या कार्यासाठी पदमश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
11 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)