डॉ. गांधी दाम्पत्याच्या पोलीस कोठडीत वाढ

अकलूज – संग्रामनगर येथील सिया हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करून तपासात निष्पन्न झाल्यानुसार 36 गर्भपात करून त्याची विल्हेवाट लावण्या प्रकरणातील अटक आरोपी डॉ. तेजस गांधी व डॉ. प्रिती गांधी यांच्याकडून आणखी तपास करण्यासाठी माळशिरसचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे, शल्य चिकित्सक श्रीकांत भुई व सोलापूरचे शल्यचिकित्सक पटनशेट्टी यांनी छापा टाकून दि.24 ऑगष्टला डॉ. गांधी दाम्पत्यास अटक करून अकलूज पोलिसांच्या स्वाधीन केले होते, त्यांच्याकडून पुढील तपास करण्यासाठी न्यायालयाने या दाम्पत्यास पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. पोलीस निरीक्षक अरुण सावंत पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)