डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात

मंचर – येथील महात्मा गांधी विद्यालय माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज, अण्णासाहेब आवटे कॉलेज, महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय व रयत इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सरपंच दत्ता गांजाळे, स्कूल कमिटीचे सदस्य संजय बाणखेले, ग्रामपंचायत सदस्य अरुण बाणखेले, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव मोरडे, प्रवीण मोरडे, अरुण लोंढे, कैलास बाणखेले आदी मान्यवर उपस्थित होते. मंचरच्या शिवाजी व संभाजी चौकात विद्यार्थ्यांनी ढोल पथक, लेझीम पथक व झांज पथक, दांडिया पथक यांची प्रात्यक्षिके सादर केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)