डॉ. कंटक यांनी साकारली वॉटर इमेज भगवद् गीता

जागतिक रेकॉर्ड बुकमध्ये होणार नोंद; विविध कलाविष्कारांसाठी तब्बल आठ वेळा सन्मान

कराड – हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला श्वास घ्यायलाही पुरेसा वेळ नसल्याचे दिसून येत असून माणसाच्या अंगी कोणती तरी एखादी कला अवगत असली की त्याचे जीवन आणखी सुकर होते. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे कराड येथील डॉ. राजेंद्र कंटक. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सांभाळत आपल्या कलेतून नवनवीन अविष्कार घडवले आहेत. त्यांच्या या कलाविष्काराची नोंद वेळोवेळी जागतिक रेकॉर्ड बुकनेही घेतली आहे. त्यांनी बनवलेल्या आणखी एका कलाविष्काराची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये होणार असून त्यानिमित्ताने कराडच्या या कलाकाराच्या कलेचा जागतिक सन्मान होणार आहे.

आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत डॉ. राजेंद्र कंटक यांनी त्यांच्या अंगी असलेल्या कलेची जोपासना करत नवनवीन जागतिक रेकॉर्ड नोंदवले आहेत. त्यामध्ये अक्षर गणेशाच्या माध्यमातून भगवद्‌गीता साकारली असून त्यांनी भगवद्‌गीतेची आरशातील प्रतिमाही बनवली आहे. या दोन्ही कलाविष्काराची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली असून त्यांनी नुकत्याच साकारलेल्या वॉटर इमेज भगवद्गितेचीही नोंद लवकरच जागतिक रेकॉर्ड बुकमध्ये होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. राजेंद्र कंटक यांनी विघ्नहर्त्या श्रीगणेशाची मात्र दीड ग्रामची सर्वात लहान चित्ररुपी भगवद्‌गीता बनवली आहे. तसेच भगवद्‌गीतेची आरशातील अत्यंत किचकट प्रतिकृती अगदी लिलया साकारली आहे. या दोन्हीही भगवद्गितेची नोंद जागतिक रेकॉर्ड बुकमध्ये झाली आहे. त्यानंतर वॉटर इमेज भगवद्‌गीता हा नाविन्यपूर्ण कलाविष्कार साकारला असून त्याचीही नोंद लवकरच जागतिक रेकॉर्ड बुककडून घेण्यात येणार आहे. भगवद्‌गीतेतील 700 श्‍लोकांच्या माध्यमातून त्यांनी ही वॉटर इमेज भगवद्‌गीता साकारली आहे.

आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांनी फक्त पेन्सिलच्या साह्याने विविध चित्रप्रकारांमध्ये काढलेल्या चित्रांची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुककडून एकदा, लिम्का बुककडून दोनदा तर इंडिया बुककडून तब्बल पाचवेळा घेतली आहे. त्यामध्ये अनेक समाज सेवकांची चित्रे, सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अनेक चित्रप्रकारातून विविध अक्षरे, अंक, शब्द, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक आदी कलाकृती रेखाटल्या आहेत. या कलाप्रकारांची अनेक प्रदर्शने राज्यातील विविध ठिकाणी भरवण्यात आली होती. त्याला कलाप्रेमी, लोकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर डॉ. कंटक यांनी आपली कला, वैद्यकीय व्यवसायासह सामाजिक बांधिलकी जोपासली असून अनेक गरजू व्यक्तींनाही त्यांनी मोलाची मदत केली आहे.

चित्रकलेच्या छंदातून घडविले नवनवीन कलाविष्कार

प्रत्येक व्यक्तीच्या अंगात एक कला असते. परंतु ती कला आणि तिचे आपल्या आयुष्यातील महत्त्व जाणून तिचे जतन, संगोपन व संवर्धन करणेही तितकेच गरजेचे आहे. डॉ. कंटक यांनीही आपल्यातील कला ओळखून ती जतनही केली आहे. त्यांनी कला नुसती जतन केली नाही, तर तिच्या माध्यमातून कलेचे नवनवीन अविष्कार घडवून त्यांनी जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. डॉ. कंटक यांनी चित्ररूपी भगवद्गगिता, मिरर इमेज भगवद्गगिता, अनेक समाजसेवकांच्या चित्रांसह सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शेकडो चित्रे, अनेक चित्रप्रकारातून विविध अक्षरे, अंक, शब्द, विविध ठिकाणचा पत्ता, मोबाईल क्रमांक आदी कलाकृती साकारल्या असून त्यात आता वॉटर इमेज भगवद्‌गीतेची भर पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)