डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनाची इंदापुरत आज पायाभरणी

रेडा- इंदापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची पायाभरणी प्रारंभ शुक्रवारी (दि. 3) होणार आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने लोकशाहिर अण्णा भाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत या भवानची निर्मिती होणार आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजीमंत्री नितीन राऊत व आमदार जोंगेद्र कवाडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकीता शहा व उपनगराध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाला माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यासह इंदापूर तालुक्‍यातील सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती नगराध्यक्षा अंकीता शहा यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)