डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरुपदी डॉ. टी.एस.एन. सास्त्री

पुणे – चेन्नई येथील डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूपदी डॉ. टी. एस. एन. सास्त्री यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “ह्यूमन राईट्‌स एज्युकेशन प्रोग्राम’चे समन्वयक आणि विधी विभागात प्राध्यापक आहेत. डॉ. टी. एस. एन. सास्त्री हे मूळचे आंध्र प्रदेशचे आहेत.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 1987 मध्ये इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ या संस्थेत प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. त्यानंतर आंध्र प्रदेशातील सर सीआआर लॉ कॉलेज आणि नंतर पॉंडेचरी विद्यापीठात रूजू झाले. त्याठिकाणी ते 2006 पर्यंत कार्यरत होते. त्याचवर्षी त्यांनी चेन्नईतील डॉ. आंबेडकर विद्यापीठात तीन वर्ष काम केले. 2009 मध्ये ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रुजू झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)