डॉ. आंबेडकर यांच्या विचारानेच भारत महासत्ता होईल -प्रा. डॉ. संदीप कांबळे

वडगाव-मावळ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील योगदान व दूरदृष्टीचे ते युगपुरुष होते, त्यांचे विचारच भारताला जागतीक महासत्ता बनवू शकेल, असे प्रतिपादन इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप कांबळे यांनी

येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य महाविद्यालयात गुरुवार दि. 6 ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र जाधवर अध्यक्षस्थानी होते. प्रा. महादेव वाघमारे, प्रा. अशोक गायकवाड, प्रा. शीतल दुर्गाडे, प्रा. शीतल शिंदे, डॉ. सुधीर ढोरे, प्रा. रोहिणी चंदनशिवे, प्रा. गजानन वडूरकर, प्रा. योगेश जाधव, प्रा. अतुल जाधव, प्रा. संतोष शिंदे व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

प्रा. डॉ. कांबळे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी जनतेला शहराकडे जाण्याचा संदेश दिला. त्यांनी तळा-गाळातील, गावकुसाबाहेरील वंचित, आदिवासी, महिला आदींना कायदेशीर हक्क मिळवून दिला व त्यांना विकासाचा मार्ग दाखवला. “शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’ हा त्यांचा संदेश जीवनाला आकार देणारा आहे. तो दबलेल्या घटकाचा हुंकार आहे. डॉ. आंबेडकर हे आता जगाला कळायला लागले आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या साहित्याचा संपूर्ण अभ्यास केल्यावरच विचारवंत डॉ. आंबेडकर कळतात. महामानवाला एका चौकटीत न बांधता सखोल अभ्यास करावा. डॉ. आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारानेच क्रांती झाली. त्यामुळे अनेक महिला प्रशासकीय अधिकारी घडल्या, असेही ते म्हणाले.

प्राचार्य डॉ. राजेंद्र जाधव म्हणाले, महामानवाचे विचार अजरामर असून राज्य घटनेमुळेच त्यांची व्यापकता कळते. त्यांचा आदर्श घेतल्यास कार्यक्षम पिढी घडेल. विक्रांत शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रा. गजानन वडूरकर यांनी प्रास्ताविक, प्रा. रोहिणी चंदनशिवे यांनी सूत्रसंचालन व प्रा. अशोक गायकवाड यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)