डॉ. आंबेडकर मिनी मार्केटप्रश्‍नी रामदास आठवलेंना निवेदन

पिंपरी- येथील बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्ट आणि त्याठिकाणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबईतील संपर्क कार्यालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध मागण्यांचे निवेदन आठवले यांना देण्यात आले. या शिष्टमंडळाशी मागण्यांविषयी चर्चा केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून चर्चा केली. तसेच या मागण्या सोडविण्याचे लेखीपत्र शिष्टमंडळामार्फत महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहे. या प्रलंबित मागण्यांसाठी या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. या शिष्टमंडळामध्ये समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफिक शेख, महाराष्ट्र मजूर पक्षाचे अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे, बहुजन प्रेरणा बुद्ध समाजिक ट्रस्ट व मार्केटचे अध्यक्ष फारुखभाई कुरेशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्टचे मार्गदर्शक बळीराम काकडे, सुरेश मिसाळ, कादीर कुरेशी व गौस कुरेशी यांचा समावेश होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)