डॉ. आंबेडकरांवर वादग्रस्त टिप्पणी केल्याने पंड्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

जोधपूर – घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी क्रिकेटपटू हार्दिक पंड्या अडचणीत आला आहे. जोधपूरच्या विशेष न्यायालयाने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

पंड्याच्या टिप्पणीविरोधात राष्ट्रीय भीम सेना संघटनेचे सदस्य डी. आर. मेघवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पंड्याने आंबेडकरांचा अपमान केला असून दलित समाजाच्या भावनाही दुखावल्या असल्याचे मेघवाल यांचे म्हणणे आहे. त्याने 26 डिसेंबर 2017 रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवर डॉ. आंबेडकर यांच्याबाबत आरक्षणाच्या मुद्यावरुन एक वादग्रस्त पोस्ट केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)