डॉ.आंबेडकरांनी कधीही भावनिक राजकारण केले नाही

दिलीप कांबळे: डॉ.आंबेडकर संग्रहालयाचे प्रेरणाभूमी असे नामकरण
पुणे  – सामाजिक, धार्मिक, आर्थिक समानतेसाठी उभारलेल्या लढ्यांचे रुपांतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय हक्‍क मिळविण्यासाठी राजकीय पक्षात केले परंतु त्यांनी कधीही भावनिक राजकारण केले नसल्याचे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्‍त केले.

सिंबायोसिस संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाचे प्रेरणाभूमी असे नामकरण कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिंबायोसिसचे डॉ.शां.ब.मुजूमदार, प्रधान संचालिका डॉ.विद्या येरवडेकर, सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.रजनी गुप्ते आणि संग्रहालयाच्या मानद संचालिका संजीवनी मुजूमदार आदी यावेळी उपस्थित होते.

-Ads-

कांबळे म्हणाले, आपला विषमता निवारणाचा संकल्प तडीस नेण्याचा मार्ग म्हणून त्यांनी राज्य घटनेच्या लिखाणाकडे पाहिले. त्यामुळे घटना लिहिताना त्यांनी कोणत्याही समाजावर अन्याय केला नाही. दरम्यान यावेळी डॉ.बाबासाहे आंबेडकर अभ्यासिकेत अभ्यास करुन विविध पदांवर नियुक्‍त झालेल्या आठ विद्यार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार यावेळी करण्यात आला.

मागास विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृहे उभारणार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना उद्देशून कांबळे म्हणाले, आपण स्विकारलेली जबाबदारी उत्तम रितीने पार पाडणे हिच देशसेवा आहे, हे लक्षात ठेवले तर कोणत्याही पदावर गेलात तरी यशस्वी ठराल. हे सांगताना त्यांनी येत्या काळात राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृहे बांधणार असल्याची घोषणा केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)