डॉ. आंबेडकरांचे स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : इंदू मिलमधील स्मारकाच्या जागेची पाहणी
मुंबई – केंद्राच्या विविध परवानगीच्या फेऱ्यात अडकलेले मुंबईच्या इंदू मिल येथील प्रस्तावित भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम येत्या दोन वर्षांत म्हणजे 14 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण होणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. 2019 पर्यंत या स्मारकाचे काम दृष्य स्वरूपात दिसेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या, शनिवारी 127वी जयंती साजरी होत आहे. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेची तसेच प्रतिकृतीची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्मारकाच्या कामाचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना जगाला आवडेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून 14 एप्रिल 2020 पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

-Ads-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरचे भव्यदिव्य असे स्मारक या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्मारकाच्या उंचीमुळे या भव्य स्मारकांचे वांद्रे-वरळी सी लींकवरून देखील दर्शन घेता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या मिळविण्यात आल्या आहेत. स्मारकाच्या काम कालबध्द पध्दतीने होण्याबाबतचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यूपीएस मदान, स्मारकाचे वास्तू विशारद शशी प्रभू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सचिव नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)