डॉ. आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी

जयदीप तावरे : माळेगाव येथील बौद्ध विहारात महामानवास अभिवादन

बारामती – महामानव बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार असून सर्वांना त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन माळेगाव (ता. बारामती)चे सरपंच जयदीप तावरे यांनी केले.
माळेगाव येथील बौद्ध विहारात महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन व पूजापाठ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तावरे यांनी केले त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, विजय भोसले यांनी त्रिशरण व पंचशिल घेतले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अजित तांबोळी, अनिल लोणकर, आप्पा बनसोडे, बंडुनाना पडर, सचिन खरात, बापू सोनवणे, रोहित लोंढे, दिलीप जाधव, संजय चव्हाण, भारत सोनवणे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य संतोष भोसले, रुपेश भोसले, विश्‍वास भोसले, प्रशांत भोसले, अजिंक्‍य भोसले यांनी केले होते.
दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे फोरमन बि. एम.तोरणे व शिक्षक, कर्मचारी यांच्या उपस्थितीत, एस. एस. एम. हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक डी. सी. धुमाळ, पर्यवेक्षक एस. एस. घुले, रमामाता नगर येथे आण्णा घोडके, तर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच जयदीप तावरे यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच व विद्यमान सदस्य जयदीप दिलीप तावरे, प्रशांत मोरे, अण्णा वाघमोडे, धर्मराज पैठणकर,ग्रामविकास अधिकारी कैलास कारंडे,राजु शेख,सुरेश सावंत यांनी अभिवादन केले. दरम्यान, शारदाबाई पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बाल सभा घेऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी 40 विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य व्ही. पी. पवार, एम. एस. सोनवलकर, टी. एम. तावरे, आर. व्ही. माळवदे यांनी केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)