डॉ. अमोल बागूल मनपाचे स्वच्छता ब्रॅंड अम्बेसेडर

नगर: पेयजल व स्वच्छता मंत्रालय,भारत सरकारच्या वतीने आयोजित स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण करीता अहमदनगर महानगरपालिका यांच्या वतीने येथील राष्ट्रपतीपदक-गिनिज-नासा सन्मान प्राप्त,सर्वाधिक पारितोषिक विजेते हरहुन्नरी कलाकार डॉ.अमोल सुभाष बागूल यांची स्वच्छता ब्रैण्ड अम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.त्यानिमित्ताने सुमारे 3 कोटी भारतीयांना स्वच्छतेचे ई-साहित्य बुलेटीन पाठवण्याचा डॉ.बागूल यांचा मानस आहे.

डॉ. बागूल यांनी जिल्ह्यातील सुमारे 152 ऐतिहासिक वास्तूंची स्वतः स्वच्छता करून त्यातील 4 वास्तूंवर 21000 दिव्यांच्या रोषणाईचा ऐतिहासिक दिवाळी हा उपक्रम राबविण्यासह जिल्हा परिषदेच्या कर्मवीर भाऊराव पाटील शालेय स्वच्छता अभियानाअंतर्गत जिल्हा स्वच्छता समितीसह सुमारे80,000 विद्यार्थ्याना स्वच्छतेविषयक प्रबोधन केले आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीने समर्थ शाळा स्वच्छता, राष्ट्रीय पातळीवर निवड झालेले स्वच्छतामित्र हे हस्तलिखित, स्वच्छ सर्वेक्षण 2018 मधील स्वच्छता ब्रैण्ड अम्बेसेडर म्हणून उत्कृष्ट कामगिरी,स्वच्छता महोत्सवाचे आयोजन, स्वच्छतेच्या घंटा गाड्यांवरील उदघोषणा, स्वच्छता संदेश देणारा जगातील सर्वात मोठा मानवी साखळीतील म.गांधीजींचा चष्मा (स्वच्छता अभियान लोगो) उपक्रमातील सहभाग, हजारो सूत्रसंचालने, रांगोळी रेखाटने, उपक्रमातून स्वच्छता जनजागृतीच्या कामगिरीमुळे डॉ. बागूल यांची स्वच्छ सर्वेक्षण 2018 नंतर 2019 मध्ये पुन्हा नियुक्ति करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामाजिक माध्यमांतील-सोशल मीडियातील सुमारे 124 मेसेजिंग अँपच्या माध्यमातून केंद्राचे स्वच्छताअँप, स्वच्छता योजना, स्वच्छता सर्वेक्षण, स्वच्छतेची प्रतिज्ञा, स्वच्छतेची सप्तपदी, घोषवाक्‍ये, चित्र, निबंध, कविता, पथनाट्य, माझी स्वच्छता सेल्फी, व्हिडिओ आदी स्वच्छतेचे ई-साहित्य बुलेटीन डॉ.बागूल महिन्यातून दोनदा ऑनलाइन पाठविणार आहेत. स्वच्छताविषयक प्रचार, प्रसार व जनजागृतीसाठी स्वच्छता ब्रैण्ड अम्बेसेडर नियुक्ती शासनामार्फत केली जाते.स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये सुद्धा विविध नाविन्यपूर्ण व लोकसहभागाच्या उपक्रमांसह डॉ अमोल बागूल सज्ज आहेत. 4 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान गृह आणि शहरी कलन मंत्रालय,भारत सरकार द्वारा स्वच्छ सर्वेक्षण 2019 सुरु होत असून 5000 गुण स्वच्छ सर्वेक्षण 2019 साठी आहेत. स्वच्छ मंच या सर्वेक्षणाचे वैशिष्ट्‌य आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)