डॉ. अमरापूरकर यांच्या मृत्यूस पालिका जबाबदार

 उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

सामाजिक संस्थेला 50 लाख नुकसान भरपाई देण्याची विनंती

मुंबई – मंगळवारी मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसात मॅनहोल्समध्ये पडल्याने डॉ. दीपक अमरापूरकर यांचा झालेल्या मृत्यूला महापालिकाच जबाबदार आहे, असा आरोप करून याप्रकरणी भादवी कलम 304 (अ) अनव्ये गुन्हा दाखल करण्याबरोबरच मुंबई महापालिकेला कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

फेडरेशन ऑफ रिटेल ट्‍रेडर्स वेल्फेअर असोसिएशने दाखल केलेली मुख्य न्यायमूर्ती मंजुळ चेल्लूर आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.

डॉ. अमरापूरकर यांच्या मृत्यूच्या पार्श्‍वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत मॅनहोल्समध्ये सुधारणा करण्यासाठी माजी सनदी अधिकारी किंवा तंत्रज्ञाची मदत घेण्यात यावी. तसेच मुख्यमंत्र्यांनी याची जबाबदारी पालीकेच्या अधिकाऱ्यावर निश्‍चित करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)