डॉ. अनिल काकोडकर यांना डॉ. दाभोळकर स्मृती पुरस्कार

सातारा – सातारा पालिकेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि सातारा कंदी पेढे असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

यंदा पुरस्काराचे पाचवे वर्ष आहे. येत्या 14 ऑक्‍टोबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता येथील शाहू कलामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्त प्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते डॉ काकोडकर यांना पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांची या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे. नियोजन समितीच्या वतीने नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, सभागृह नेत्या स्मिता घोडके, पक्षप्रतोद निशांत पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुजाता राजेमहाडिक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

-Ads-

यंदाच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार समितीच्या तब्बल तीन बैठका झाल्या. या बैठकीत डॉ. अनिल काकोडकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. यापूर्वी डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर या चौघां मान्यवरांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. डॉ. अनिल काकोडकर यांचे भारताच्या अणुसंरचना व विकास क्षेत्रात मोठे योगदान आहे. अणुउर्जा स्वावलंबनात भारताला आघाडीवर नेण्यात डॉ. माशेलकर यांचा मोठा वाटा आहे. येथील शाहू कला मंदिर येथे 14 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होत आहे.

दोन वर्षाच्या विलंबानंतर का होईना सातारा पालिकेने हा पुरस्कार जाहीर केला याबद्दल नगर विकास आघाडी व भाजपच्या नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचे या पुरस्कार सोहळ्यासाठी विशेष सहकार्य लाभले आहे.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)