डॉल्बी वाजली तर होणार थेट जप्त

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पोलीस करणार अंमलबजावणी
सातारा, दि.9 ( प्रतिनिधी ) – यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी वाजली तर थेट जप्त होणार आहे. पोलिसांच्या प्रस्तावावर नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतचे आदेश दिले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व विविध संघटना प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशमुख यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, नगराध्यक्षा माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, उपअधीक्षक गजानन राजमाने उपस्थित होते.
बैठकी दरम्यान, गणेशोत्सवात अनेक मंडळे डॉल्बीसाठी अगावू रक्कम देतात आणि मिरावणुकी मात्र दरम्यान पोलीस हे कारवाई करतात. त्यामुळे मंडळांचे पैसे वाया जातात. त्यासाठी डॉल्बीबाबत प्रशासनाची भूमिका काय आहे? अशी विचारणा नरेंद्र पाटील यांनी केली. त्यावर माहिती देताना पोलीस अधीक्षकांनी यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी वाजली तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली. तसेच तळ्यांमध्ये विसर्जन करण्याबाबत उच्च न्यायालयात नेमका काय निर्णय झाला अशी विचारणा अनेकांनी केली. त्यावर खुलासा करताना मुख्याधिकारी शंकर गोरे म्हणाले, न्यायालयाने पालिकेच्या मालकीची असलेली मोती तळे व फुटका तलावात विसर्जन करता येणार नसल्याचे सांगितले असून मंगळवार तळे हे खासगी मालकीचे आहे त्या मालकांशी चर्चा विनिमय करून व प्रदूषणाचे नियम पाळून विसर्जन करण्याच्या बाबत मत नोंदविले असल्याचे गोरे यांनी सांगितले.
शहरात मोठ्या उंचीच्या गणेशमूर्तींवरून श्रीकांत शेटे यांनी चिंता व्यक्त केली. मोठ्या मूर्ती आणताना शहरात विद्युत पुरवठा खंडित करावा लागत असून त्याचा परिणाम उद्योगांवर होत आहे. तसेच शेजारील पुण्यात देखील तुळशीबाग वगळता सर्व मंडळे 6 फुटा पर्यंत उंचीच्या मूर्ती बसवत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच यावेळी अनेक मंडळाच्या प्रमुखांनी गणेशोत्सवातील शेवटचे पाच दिवस रात्री 12 पर्यंत स्पीकर व पारंपरिक वाद्य वाजविण्याची परवानगी देण्याची विनंती यावेळी केली.

त्यांना व्यासपीठावर स्थान द्या
नगरसेवक शेखर मोरे यांनी बैठकी दरम्यान नरेंद्र पाटील हे गणेशोत्सव मंडळांऐवजी प्रशासनाची बाजू घेत प्रश्न उपस्थित करत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बैठकीत पाटील यांना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या शेजारी नव्हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शेजारी बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था करावी अशी मागणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
151 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
3 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)