डॉल्बीवाल्या बोलवीनं पोलीसाला…

file photo

भवानीनगर- बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुमारे 47 गावांमध्ये डिजे वाजविण्यास बंदी घालण्यात आलेली असताना काही ठिकाणी डिजेच्या नावाखाली मोठे स्पिकर वाजविले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. जत्रा, यात्रा यासह लग्नाच्या तिथी निघू लागल्याने असे प्रकार वाढतील. कर्कश आवाज करीत गावातून कोणी डिजे लावण्याचा प्रयत्न केल्यास डॉल्बीवाल्या बोलवीनं पोलीसाला…, असा स्पष्ट शब्दांत नागरिकांनी इशारा देत, अशा हौशा गवश्‍यांची माहिती कळवावी, असे आवाहन बारामती ग्रामीण पोलीसांतर्फे करण्यात आले आहे.
बारामती ग्रामिण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांत डिजे लावण्यावर बंदी आहे. तरीही काही ठिकाणी असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी पोलीसांकडे केल्या जात आहेत. डीजे वापरण्यास कायदेशीररित्या बंदी घालण्यात आलेली आहेत. शहरासह ग्रामीण भागातही हा नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना आहेत. परंतु, ग्रामिण भागात डिजे लावण्याबरोबरच मोठे स्पीकर लावून आवाज वाढवीत सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रकार केला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. बारामती शहरात डिजे लावण्याचे प्रमाण कमी असले तरी शहरासह ग्रामिण भागात बाहेरून येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींकडून नियम मोडले जातात. याशिवाय ग्रामिण भागात रात्रीच्यावेळी निघणाऱ्या वरातीत, डिजे लावण्याचे प्रमाण आजही मोठे आहे. परंतु, आता कोणी बारामती पोलीस स्टेशनच्या हद्दीत डिजे लावण्याचा प्रकार करू नये. कारण, असा गुन्हा करणाऱ्यांवर डिजे सिस्टीम जप्त करण्याबरोबर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी सांगितले की, प्रत्येक लग्नात बॅंड वाजविताना त्यांना देखील आवाजाची मर्यादा दिलेली आहे. त्यामुळे डिजेच्या आवाजाचा प्रश्‍नच येत नाही. शाळा, महाविद्यालये, दवाखाने यासह मंगल कार्यालये, मंदिर परिसरात राहणाऱ्यांना अशा मोठ्या आवाजाचा त्रास होत असतो. यामुळे नागरिकच आता तक्रारी करण्यास पुढे येत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)