डॉल्बीवर पोलिसांची जप्तीची कारवाई

दहीहंडीला आवाज मर्यादेचे उल्लंघन करणारी साऊंड सिस्टीम लावल्याने सातारा शहर पोलिसांनी तीन मंडळांचे डॉल्बी जप्त केले. मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, डीजे, ट्रॅक्टरमालक यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

या कारवाईमुळे डीजे मालक व मंडळाच्या कार्यकर्त्यांची पोलिस ठाण्याबाहेर गर्दी जमली होती. सातारचे पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली.

सातारा शहरातील रविवार पेठेतील दोन तर ढोर गल्लीतील एक अशा तिन ठिकाणी आवाज मर्यादेचे उल्लंघन केले जात आहे. अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सातारा शहरचे पो.नि. नारायण सारंगकर यांना सुचना केली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. जप्त केलेल्या डॉल्बी मालक व आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी उपविभागीय कार्यालयाकडे पाठवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
18 :thumbsup: Thumbs up
15 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
6 :blush: Great
0 :cry: Sad
42 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)