डॉलर देण्याच्या बहाण्याने 4 लाखाची फसवणूक करणाऱ्यास कोठडी

पुणे – अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने 4 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी उत्तरप्रदेश येथील नागरिकाला येरवडा पोलिसांनी अटक केली. त्याला 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. मुस्तफा साहेबअली काझी (वय 26, रा. विश्रांतवाडी, मूळ उत्तरप्रदेश) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत विशाल विजय गायकवाड (वय 27, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 14 जानेवारी आणि त्यापूर्वीच्या चार दिवसाच्या कालावधीत घडली. फिर्यादी यांची मोबाईल शॉपी आहे.

काझी तेथे जात असत. 20 अमेरिकन डॉलरच्या 1 हजार 673 नोटा असल्याचे सांगितले. फिर्यादींना त्यातील 1 नोट दिली. आणखी नोटा देण्याचे अमिष दाखवून फिर्यादींकडून 4 लाख रुपये रुपये लांबविल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी काझी याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याचे आणखी दोन साथीदार होते. त्यांच्या शोधासाठी आणि गुन्ह्यातील 4 लाख रुपये जप्त करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)