डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा कोसळला

दिल्ली-रुपया देशातील कारणामुळे नाही तर परदेशातील कारणामुळे घसरण असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे. या वर्षात आतापर्यंत रुपयाचे मूल्य 8 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. या आठवड्यात तर रुपयाची अवस्था फारच खराब झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारीही रुपयाची मूल्यात 24 पैशांची घट होऊन आता रुपयाचे मुल्य प्रति डॉलरला 71.99 रुपये इतके झाले आहे. आयातदारांकडून डॉलरची सशक्त मागणी आणि भांडवली बाजारातून विक्रीपायी विदेशी गुंतवणुकीचे निर्गमन असा दुहेरी फटका रुपयाला बसतांना दिसला.

दरम्यान रुपया कोणत्या पातळीवर स्थिरावेल यावर चलनबाजारात असाहाय्यपणे चर्चा सुरू आहे. नजीकच्या काळात त्यापासून उसंत मिळण्याची शक्‍यता नसल्याचा काही तज्ज्ञांचा कयास आहे. बहुतांश तज्ज्ञ रुपयाकडून 72-73चा तळही लवकरच दिसेल अशी शक्‍यता वर्तवित आहेत.

खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत निरंतर सुरू असलेली वाढ तसेच चीन-अमेरिका या महासत्तांमध्ये चाललेले व्यापारयुद्ध याचे चलन बाजारात नकारात्मक पडसाद उमटत आहेत. याचा रुपयाच्या मूल्यावर ताण पडलेला दिसून येतो. इंधन आयात खर्चात मोठया वाढीने देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढून अर्थव्यवस्थेला याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील, या चिंतेने रुपयाच्या मूल्यातील अस्थिरतेला खतपाणी घातले आहे.

या स्थितीत रुपयाने डॉलरमागे 71 पल्याडची पातळी गाठणे फारसे आश्‍चर्यकारक नाही. या मागची कारणे वाढती तूट, पर्यायाने अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, तेल भडका, विदेशी गुंतवणूकदारांचे पलायन वगैरेबद्दल गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहेच, त्याचेच प्रत्ययी परिणाम रुपयाच्या घसरत्या मूल्यात दिसून येत आहेत.

रुपयाची पडझड सुरू असताना, रिझर्व्ह बॅंकेने निरपेक्षवृत्ती ठेवून कोणताही हस्तक्षेप न करण्याचे धोरण असल्याने रुपयाच्या घसरगुंडीला बांध घालणे आणखी अवघड बनले असल्याचे मत, स्टेट बॅंकेच्या संशोधन अहवालाने व्यक्त केले आहे. ही पडझड रोखण्यासाठी व्याजदरात वाढीचे कठोर पतधोरण रिझर्व्ह बॅंकेने स्वीकारणे अपरिहार्य असून, त्याचप्रमाणे स्थायी ठेव सुविधा (एसडीएफ) या कल्पनेला स्वीकृती देऊन त्याची ताबडतोबीने अंमलबजावणी करावी, असा स्टेट बॅंकेने या टिपणाद्वारे नियोन करणाऱ्यांना उपाय सुचविला आहे.

देशातील परिस्थिती खराब आहे म्हणून रुपयाचे अवमूल्यन झालेले नाही. तर जागतिक परिस्थिती खराब असल्यामुळे डॉलर वगळता इतर चलनांचे मूल्य कमी झाले आहे. त्याचबरोबर भारताकडे परिकीय चलनाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यामुळे रुपया घसरला तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर कसलाही परिणाम होणार नाही.

अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)