‘डॉन 3’ साठी शाहरुखची तयारी नाही

शाहरुख खान “डॉन 3’ची तयारी करायला लागला आहे, असे ऐकिवात आहे. हे समजल्यापासून त्याच्या फॅन्सला लय भारी फील यायला लागला आहे. “झिरो’च्या फ्लॉप इमेजमधून बाहेर येण्यासाठी शाहरुखला असलाच मसालेदार बॉलीवूडपट हवा आहे. विशेषतः त्याच्या गेल्या वर्षभरातील करिअर ग्राफला उंचवायचे असेल, तर “डॉन’ फ्रॅंचायजीचा तिसरा सिनेमा त्याच्यासाठी योग्य ठरेल, असे मत व्यक्‍त व्हायला लागले.

विशेषतः भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांचा बायोपिक असलेल्या “सारे जहां से अच्छा’ मधून शाहरुख बाहेर पडला, तेव्हापासूनच या चर्चेला सुरुवात झाली होती. किंबहुना “डॉन 3’साठीच शाहरुखने “सारे जहां से…’सोडला असेही बोलले जाऊ लागले होते. मात्र शाहरुखच्या फॅन्ससाठी हा आनंद विशेष टिकणारा नाही. कारण अशा कोणत्याही “डॉन 3’ची तयारी शाहरुख करत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जेंव्हा “झिरो’ फ्लॉप झाला, तेंव्हाच शाहरुखने “सारे जहांसे अच्छा’ सोडला होता. त्याला अंतराळाशी संबंधित कोणताही सिनेमा करायला नको होता. मात्र त्याचा “डॉन 3’शी काहीही संबंध नाही. “डॉन’ सिरीजशी संबंधित पब्लिकने सध्या तरी असा तिसरा भाग करण्याची काहीही योजनाच असल्याचे स्पष्ट करून टाकले आहे. डायरेक्‍टर फरहान अख्तरकडे त्यासाठी कोणतीही स्क्रीप्ट देखील आलेली नाही. शाहरुख आणि फरहान अख्तर दोघेही गेल्या तीन वर्षांपासून तिसऱ्या भागासाठी चांगल्या स्क्रीप्टच्या शोधात आहेत. पण तशी स्क्रीप्टच मिळत नसल्याने हे प्रकरण रखडले आहे. याशिवाय फरहान अख्तरला सध्या आपल्या अॅक्‍टिंग करिअरवर लक्ष केंद्रित करायचे असल्याने त्याने लगेच नव्या सिनेमाच्या डायरेक्शनला सुरुवात करायची नाही, असे ठरवले आहे. तो स्वतः “तुफान’ या आगामी सिनेमात काम करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)