डॉक्‍टर व्हायचे होते – पूनम धिल्लन

आपल्याला बॉलिवूड्‌मध्ये अभिनेत्री व्हायचे नव्हते, तर डॉक्‍टर व्हायचे होते असे पूनम धिल्लनने म्हटले आहे. आपल्या 56 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने आपले मनोगत व्यक्‍त केले. “सोनी महिवाल’, “तेरी महेरबानियां’,”कर्मा’, “सोने पे सुहागा’ यासारख्या तब्बल 90 सिनेमांमध्ये आपल्या सौंदर्याची अदा दाखवलेल्या पूनमला अभिनेत्री होण्यापेक्षा डॉक्‍टर होण्यातच अधिक रस होता, हे ऐकून धक्काच बसतो.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आपला पहिला सिनेमा मोठ्या निर्मात्याचा असावा असे वाटत असते. मात्र पण फारच कमी लोकांची ही अपेक्षा पूर्ण होऊ शकते. पूनमला वयाच्या 16 व्या वर्षी “मिस इंडिया’ किताब जिंकता आला. त्यानंतर यश चोप्रांच्या “त्रिशुल’साठीची ऑफर मिळाली होती. सतत अभ्यासात गर्क असलेल्या पूनमला सिनेमात काम वगैरे करणे म्हणजे वेळेचा अपव्यय करण्यासारखे वाटले आणि तिने या सिनेमात काम करण्यास सरळ सरळ नकार देऊन टाकला होता. मात्र नंतर तिने का रोल स्वीकारलाही होता.

-Ads-

यश चोप्रांनी पूनमला “नूरी’साठी लीड रोल दिला आणि तिच्या करिअरची दिशाच बदलून गेली. फारुख शेखबरोबरच्या या सिनेमात नूरीच्या रोलचा तिच्यावर शिक्का बसला आणि तिचे टोपणनावच नूरीवाली पूनम असे बनून गेले. पूनमला डॉक्‍टर बनायचे होते. पण तिच्या मोठ्या भावाने तिला या क्षेत्रात येण्यास विरोध केला. यानंतर सिनेमातच तिचे करिअर बनत गेले. दिग्दर्शक अशोक ठकारियाबरोबर विवाहबद्ध झालेली पूनम पुढे सिनेसृष्टीपासून दूर गेली आणि आता तिने स्वतःला काही सामाजिक कामातही व्यस्त करून घेतले आहे. व्यसनमुक्‍ती, कुटुंब नियोजन आणि एड्‌स सारख्या महत्वाच्या विषयांबाबत जनजागृती करणाचे काम पूनम करते आहे. आता छोट्या छोट्या रोलमध्ये ती पुन्हा पडद्यावर दिसते आहे. मात्र स्वाभाविकपणे तिचा रोल आई, वहिनी असाच असतो आहे. त्यापेक्षा आता दिग्दर्शन आणि निर्मितीच्या कामात लक्ष घालण्याची तिची ईच्छा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)