डॉक्‍टर मिळत नसतील तर ग्रामीण रुग्णालयांना टाळे ठोका

एकनाथ खडसे यांनी आरोग्यव्यवस्थेचे काढले वाभाडे
मुंबई – मंत्रिपदावरुन पायऊतार झालेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे सरकारविरोधात बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालये व आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेबद्दल बोलताना खडसे यांनी आरोग्यव्यवस्थेचे वाभाडेच काढले. आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांना पत्र लिहूनही डॉक्‍टरच मिळत नसतील तर सरकारी रुग्णालये, आरोग्य केंद्रांना समारंभपूर्वक टाळे ठोका, अशी संतप्त मागणी त्यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभेत अनुदानाच्या माण्यांवर चर्चा करताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला लक्ष्य केले. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघातील मेडीकल कॉलेजसाठी अर्थसंकल्पात कोणतीच तरतूद न केल्याने खडसेंनी संताप व्यक्त केला.

मुक्ताईनगर येथून एक गरोदर महिला उपचारासाठी मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात आल्या होत्या. या महिलेची प्रकृती फारच गंभीर होती. जे.जे.मध्ये व्हेंटिलेटर नसल्याने या महिलेला दाखल करून घेतले नसल्याचे खडसे यांनी सांगितले. यासंदर्भात आपण तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांशी बोललो. तेव्हा त्यांचे नाव विचारले तर त्यांनी नाव न सांगण्याबाबत आचारसंहिता असल्याचे सांगितले. या डॉक्‍टर महाशयांनी रुग्णालयात जागा शिल्लक नसल्याचे सांगत त्या महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर उपचाराअभावी त्या महिलेचा शनिवारी मृत्यू झाला, असे सांगतानाच याला जबाबदार कोण असा सवाल खडसे यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)