डॉक्‍टर पतीकडून पत्नीची 40 लाखांची फसवणूक

पिंपरी – पती-पत्नीने फ्लॅट विकत घेऊन त्यावर 32 लाखांचे कर्ज काढले. त्यानंतर पतीने पत्नीच्या खोट्या सह्या करून तब्बल 40 लाखांचे कर्ज काढून फसवणूक केली. हा प्रकार पिंपरीतील संत तुकारामनगर येथे नुकताच उघडकीस आला.

याबाबत योगिता अमोल होळकुंदे (वय 33) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती डॉ. अमोल होळकुंदे (रा. फ्लॅट नं. 2, मित्तल को-ऑप. हौसिंग सोसायटी, अजमेरा, पिंपरी), प्रशांत परब, प्रकाश कन्हैया यांच्यासह आणखी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगिता व आरोपी डॉ. अमोल होळकुंदे हे पती-पत्नी आहेत. या दोघांनी अजमेरा येथील अंतरिक्ष सोसायटीजवळ 35 लाख 50 हजारांना फ्लॅट घेतला. हा फ्लॅट घेण्यासाठी त्यांनी एचडीएफसी बॅंकेचे 25 लाख 50 हजार कर्ज काढले. इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सचे लोन टॉपअप करून 7 लाखांचे कर्ज काढले. तसेच 2016 मध्ये आरोपी डॉ. अमोल होळकुंदे हा पत्नी व मुलीला सोडून गेला. त्यानंतर आरोपी अमोलने साथीदारांच्या मदतीने 3 मे 2017 रोजी त्याच फ्लॅटवर पत्नीच्या बनावट सह्या करून वाकडेवाडी येथील बजाज फायनान्सचे तब्बल 40 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केली. हा गुन्हा पिंपरीतून खडकी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. खडकी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)