“डॉक्‍टर डे’च्या निमित्ताने डॉक्‍टरांचा सन्मान 

तळेगाव दाभाडे – येथील रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, तळेगाव दाभाडे व मावळ डॉक्‍टर्स असोसिएशन यांच्या वतीने रविवारी (दि. 1) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तळेगाव जनरल हॉस्पिटल येथील रिक्रिएशन हॉलमध्ये डॉक्‍टर्स डे निमित्त तळेगाव दाभाडे पंचक्रोशीतील डॉक्‍टरांचा सन्मान व डॉ. कृष्णकांत वाडोकार यांचा देवदूत पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला असल्याची माहिती विलास काळोखे, डॉ. दिलीप भोगे यांनी दिली.

या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी माजी आमदार कृष्णराव भेगडे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून उर्वरित महाराष्ट्र वैधाविक विकास मंडळ माजी अध्यक्ष उल्हास पवार, डिस्ट्रिक्‍ट ऑफिसर व चिंचवड निरामय हॉस्पिटलचे संचालक रो. डॉ. श्रीरंग गोखले, तसेच आयएमए महाराष्ट्र राज्य माजी अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कार्यक्रमाचे आयोजक रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, तळेगाव व मावळ डॉक्‍टर्स असोसिएशन हे असून या कार्यक्रमास तालुक्‍यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व तालुक्‍यातील सर्व डॉक्‍टर्स उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)