डॉक्‍टर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आजपासून; पुणे डॉक्‍टर्स संघटनेतर्फे आयोजन

पुणे- पुणे डॉक्‍टर्स संघटनेतर्फे तिसऱ्या डॉक्‍टर्स प्रीमियर लीग राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्यापासून (गुरुवार) आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा 1 ते 4 फेब्रुवारी 2018 या कालावधीत नेहरू स्टेडियम, स्वारगेट आणि शिंदे हायस्कूल, सहकारनगर येथील मैदानावर होणार आहे. पुण्यासह, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सांगली, ठाणे, रायगड, मुंबई व पनवेल या शहरातील डॉक्‍टरांचे संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत

या स्पर्धेबाबत अधिक माहिती सांगताना पुणे डॉक्‍टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. संभाजी करंडे आणि डॉ. राजेश माने यांनी सांगितले की, दरवर्षी विविध राज्यातील डॉक्‍टर्ससाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वर्षीच्या डॉक्‍टर्स प्रीमियर लीगमध्ये 12 संघांचा समावेश असून या संघांचे 4 गट करण्यात आले आहेत.

पुणे रॉयल ईगल्स्‌, पुणे वॉरियर्स, जीवनज्योत व्हीसीकेडीए, कोल्हापूर किलर्स, सांगली स्ट्रायकर्स, हृदयस्पर्श सांगली स्पार्टन्स्‌, नाशिक मास्टर्स, ठाणे सुपर्ब, राजगड राजे, पनवेल युवा, जीएमसी मुंबई व मुंब्रा कास्पा हे संघ स्पर्धेत झुंजणार आहेत.

पीडीसीचे कमिशनर डॉ. अनिल लिंगडे म्हणाले की, स्पर्धेतील विजेत्या करंडक व 50 हजार रुपयांचे पारितोषिक व उपविजेत्या संघाला करंडक व 31 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, सामनावीर व मालिकावीर अशी विविध वैयक्‍तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)