डॉक्‍टरांनी जेनेरिक औषधे रुग्णांना लिहून द्यावीत – डॉ. अजय चंदनवाले

पुणे – जेनेरिक औषधांविषयी वैद्यकीय तज्ज्ञ आणि अध्यापकांमध्ये जागरुकता व्हावी व त्यांनी ही औषधे रुग्णांना लिहून द्यावीत तसेच त्या औषधांविषयी रुग्नांना माहितीही द्यावी, असे आवाहन ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी केले.

वैद्यकीय उपचारांमध्ये जेनेरिक औषधांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा झाली. त्यावेळी डॉ. चंदनवाले बोलत होते. या कार्यशाळेला आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्‍त एस. बी. पाटील, ब्युरो ऑफ फार्मा पब्लिक सेक्‍टरचे आर. एन. नंदी, धीरज शर्मा, डॉ. अभय सराफ आदी उपस्थित होते. या परिषदेच्या माध्यमातून आम्ही जेनेरिक औषधांविषयीची सुरक्षितता व उपयुक्‍तता याबद्दल माहिती देऊन त्यातील गैरसमज दूर केले. यावेळी डॉक्‍टरांची व्याख्याने तसेच चर्चासत्रे झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)