डॉक्‍टरांच्या कलाविष्काराला उपस्थितांची दाद

पिंपरी – इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड भोसरी शाखेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर येथे आयोजित केलेल्या वार्षिक कलाविष्कार कार्यक्रमाला डॉक्‍टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रंगमंच व नटराजाचे पूजन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. संजीवकुमार पाटील यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर भोसरी शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवधर, सचिव डॉ संजीव दात्ये, उपाध्यक्ष डॉ. सुहास माटे, सहसचिव डॉ. विजय सातव आदी उपस्थित होते. यावेळी पिंपरी-चिंचवड परिसरातील डॉक्‍टर व त्यांच्या कुटुंबियांनी कलागुण सादर केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणेश वंदनेने सुरु झालेला कार्यक्रम, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभासद डॉक्‍टरांच्या गाणी व नृत्याविष्कारांनी रंगतदार केला. मध्यंतरात वुमन्स विंग ची स्थापना करण्यात आली. डॉ. माया भालेराव यांची वुमन्स विंगच्या अध्यक्षपदी निवड झाली. वुमन्स विंगच्या कार्यकारी मंडळाला पदाची शपथ देण्यात आली. पुन्हा उत्तरार्धात सांस्कृतिक कार्यक्रम झाले. ए गुजरते हुए साल ही गत वर्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी कविता डॉ. संतोष लाटकर यांनी सादर केली. त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

डॉ. संजीवकुमार पाटील यांनी सादर केलेल्या झिंगाट गाण्याने सर्व प्रेक्षकांना नाचायला भाग पाडले. तर डॉ. सुशील मुथियान यांनी सादर केलेल्या राम लखन मधील गाण्यावर नृत्याला टाळ्यांची दाद मिळाली. फॅशन शोने कार्यक्रमाची सांगता झाली.सूत्रसंचालन डॉ. दिपाली लाटकर व डॉ. संतोष लाटकर यांनी केले. डॉ. संजीवकुमार पाटील, डॉ. शुभांगी टेकुरकर, डॉ. माधव कुलकर्णी यांनी संयोजन केले. डॉ. संजीव दात्ये यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)