डॉक्‍टरला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी – डॉक्‍टरांच्या चुकीमुळे तरुण रुग्ण दगवल्याचा आरोप करत नातेवाईकांकडून डॉक्‍टरला मारहाण करण्यात आली. हा प्रकार पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात घडला. या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्‍टरांनी संप पुकारला होता. अखेर सायंकाळी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर डॉक्‍टरांनी आंदोलन स्थगित केले.

केतन अशोक गायकवाड (वय-26, रा. एच.ए, पिंपरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. आदित्य पांडियाल यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात रुग्णालयात केतन याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी (दि. 23) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चालत्या-बोलत्या रुग्णाचा अचानक मृत्यूबाबत नातेवाईकांनी एका डॉक्‍टरकडे विचारणा केली. मात्र, या डॉक्‍टरने समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे मृताच्या नातेवाईक महिला परिचारिकाने डॉक्‍टरने काय उपचार केले हे पाहण्यासाठी कागदपत्रे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका डॉक्‍टरने त्या महिलेचा हात पिरगळला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्‍टरला मारहाण केली. त्यांनी शनिवारी सकाळी प्रवेशद्वारावर काम बंद आंदोलन केले. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर शनिवारी सायंकाळी पोलिसांनी अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर डॉक्‍टरांनी आंदोलन मागे घेतले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)