डॉक्टरांचा प्रस्तावित देशव्यापी संप तात्पुरता स्थगित

मुंबई: डॉक्टरांनी 2 एप्रिलला पुकारलेला देशव्यापी संप तात्पुरता स्थगित केला आहे. दोन एप्रिलला डॉक्टरांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक आहे, त्या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकावरुन डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं होतं.  हे विधयक सरकारने राज्यसभेत मांडलं, पण त्यावर चर्चा होऊ शकली नाही. संसदीय समितीने सरकारला या विधेयकात काही बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यातील काही सरकारने मान्य केल्या. डॉक्टरांनी या विधेयकात आणखी बदल सुचवले आहेत. या मागणीसाठी त्यांनी दोन एप्रिलला संपाचा इशारा दिला होता. मात्र आता तो तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)