डेस्टिनेशन खंडाळा

 संदीप राक्षे

दुष्काळाचा शाप उरावर घेऊन कायमच जगणाऱ्या खंडाळा तालुक्‍याची सामाजिक आणि राजकीय दृष्टीने होणारी परवड सातारा जिल्ह्याने नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रानेच पाहिली आहे. खंडाळ्याचा आमचा शेतकरी ज्या तडफेने अवर्षणाशी टक्‍कर देत आता औद्योगिकरणाची कास पकडतो, गेल्या चाळीस वर्षातील हा बदल निश्‍चितच सुखावणारा आहे.

निरामाईचे सानिध्य आणि उत्तरेकडून पुणे जिल्ह्यातील सारोळ्याच्या पूर्वेला पसरलेला आणि कोरेगाव व वाई या दोंन्ही तालुक्‍यांना जोडणारा खंडाळा सातारा जिल्ह्याचे तसे प्रवेशद्वारच आहे. संपुर्ण महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा मोठा इतिहास घडवणाऱ्या क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या पत्नी आणि भारतातल्या पहिल्या आद्यशिक्षिका सावित्री बाई फुले यांच्या नायगाव या जन्मगावी समतेच्या क्रांतीने मुळ धरले. आणि त्या प्रकाशात महाराष्ट्रातल्या अठरापगड जाती उजळून निघाल्या. याच खंडाळ्याच्या मातीत संघर्षाचे बिज रूजलेले आहे. मात्र दुष्काळाची उपेक्षा संपवता आलेली आहे. हेच दु:ख आहे.

निरामाईच्या सानिध्यात असूनही आणि कुशीत वीर सारखे धरण येवूनही अवर्षणाचा शिक्‍का जात नाही पण राजकीय इच्छाशक्‍ती प्रबळ असल्याने त्यांना वाव देणाऱ्या नगरपंचायती आणि त्यांचे राजकारण मूळ धरू लागले आहे. शिरवळच्या कानाकोपऱ्यात तब्बल 110 कंपन्या घेऊन पसरलेल्या शिरवळ औद्योगिक वसाहतीचा डंका आता संपूर्ण भारतात वाजू लागला आहे. हाताला रोजगार मिळाल्याने पुण्या-मुंबईला धावणारा तरूण बळीराजा आता माय पांढरीतच स्थिरावू लागला आहे. शिरवळच्या भुईकोट किल्ल्याने जो इतिहास आपल्या मस्तकात लपवला आहे, त्या इतिहासाच्या सुवर्ण आठवणींना पुन्हा डेस्टिनेशन खंडाळा हे नाव आदराने मिळू लागले आहे.

तब्बल एक लाख पासष्ट हजार कोटी अशी आर्थिक उलाढाल करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चाकण, पिंपरी चिंचवड, देहू रोड, रामटेकडी, दिघी, कळस, पानमळेवाडी या औद्योगिक वसाहती बदलत्या औद्योगिक आणि आर्थिक धोरणांमुळे अडचणीत आल्या होत्या, त्यांना सातारा जिल्ह्यातील शिरवळ या प्रांताने हात दिला आहे. हळूहळू डेस्टिनेशन शिरवळ हा सिलसिला सुरू झाल्याने शिरवळ एमआयडीसीकडे नामवंत कंपन्यांचा ओघ सुरू झाला आहे. लोणंदच्या कांदा मार्केटवरही साताऱ्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असते.

लासलगावच्या जोडीने लोणंदचा गरवा कांदाही महाराष्ट्राच्या आर्थिक उलाढालीचे निमित्य ठरू लागला आहे. खंडाळा तालुका हा पूर्वी पासून दुष्काळग्रस्त तालुक़ा गणला जातो. तसेच राजकीय क्षेत्रात दुष्काळी होता पुरुषोत्तम जाधव साहेबांच्या रूपाने 2009 साली लोकसभा निवडणुक लढवत कमी अवधीत समाजकारणातून राजकीय क्षेत्रात येऊन अडीच लाख मते घेत खंडाळा तालुक्‍याची राजकीय अस्मिता प्रथमच देश भरात पोचवली.

खंडाळा तालुक्‍यात औद्योगिकरण वाढीस लागत असताना येणाऱ्या कंपन्यांना विज पाणी यांचा पुरवठा योग्य होत नव्हता याची याच कारणामुळे एशियन पेंट थरमॅक्‍स डेट वायलर यांसारख्या कंपन्या तालुक्‍यातील प्रकल्प बंद करण्याच्या स्थितीत असताना पुरुषोत्तम जाधव साहेबांनी स्वतः पुढाकार घेत मालकीच्या जमिनीतून विजवाहिन्या टाकायला परवानगी देत कंपन्या तालुक्‍यातुन इतरत्र जाऊन दिल्या नाहीत आज हजारो तरुण या कंपन्यांच्या माध्यमातून स्वतःची उपजीविका करताना दिसत आहेत.

क्रीडाक्षेत्रात नुकत्याच झी टॉकीज च्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत सातारा जिल्ह्याचा समावेश नव्हता ही बाब समजताच पुरुषोत्तम जाधव साहेबांनी त्वरीत झी टॉकीजच्या प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेऊन सातारा जिल्ह्याच्या संघाचा समावेश स्पर्धेत करायला लावला.

संघाची मालकी हक्क स्वत: विकत घेतले. ऑलम्पिक मध्ये देशासाठी पहिले पदक विजेते साताऱ्याचा अभिमान पै. खाशाबा जाधव व देशभरात साताऱ्याचे नाव राजकीय-सामाजिक क्षेत्रात उंचावणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मरणार्थ संघाचे नाव यशवंत सातारा ठेवले. आपल्या संघाने सर्वोत्तम कामगिरी करत स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. पुरूषोत्तम जाधवांच्या निमित्ताने पुन्हा एकदा साताऱ्याची अस्मिता प्रखरतेने झळाळली आणि क्रीडा क्षेत्रातील साताऱ्याच्या गुणवत्तेचा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)