डेव्हिस लढतीतून युकी भांब्री, शरण यांची माघार

नवी दिल्ली: पुढच्या आठवडाअखेरीस खेळल्या जाणाऱ्या सर्बियाविरुद्धच्या डेव्हिस करंडक जागतिक गट प्ले-ऑफ लढतीतून भारताचा अव्वल एकेरी खेळाडू युकी भांब्री आणि आशियाई सुवर्णपदक विजेता दिविज शरण यांनी दुखापतीमुळे माघार घेतली आहे.

तसेच पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या लढतीत खेळण्यास सुमित नागलने नकार दिला असल्यामुळे भारतीय संघ पेचात पडला आहे. येत्या 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान क्रॅलजेव्हो येथे होणाऱ्या या लढतीच्याच कालावधीत सुमित नागल पोलंडमधील चॅलेंजर स्पर्धेत सहभागी होत आहे. युकी भांब्रीची गुडघ्याची दुखापत अद्याप बरी झालेली नाही. तर बोपण्णाच्या साथीत आशियाई सुवर्ण जिंकणाऱ्या दिविजच्या खांद्याचा स्नायू दुखावला असून त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

त्यामुळे मूळ संघात राखीव असलेल्या साकेत मायनेनीचा युकीच्या जागी संघात समावेश करण्यात आला असून श्रीराम बालाजी दिविज शरणची जागा घेणार आहे. पुण्याचा गुणवान युवा खेळाडू अर्जुन कढे राखीव खेळाडू म्हणून संघात सामील होणार असल्याची माहिती भारतीय टेनिस संघटनेच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एस. पी. मिश्रा यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)