डेव्हिस चषक लढतीतून युकी भांब्रीची माघार

नवी दिल्ली – डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील चीनविरुद्धच्या आगामी आशिया-ओशनिया गट 1 साखळी लढतीतून भारताचा अव्वल मानांकित टेनिसपटू युकी भांब्रीने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. युकी भांब्रीच्या पोटाचा स्नायू दुखावला असल्यामुळे तो या लढतीत खेळू शकणार नसल्याचे समजते.

युकीच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून राष्ट्रीय टेनिस निवड समितीने युवा खेळाडू प्रजनेश गुणेश्‍वरनची निवड केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत झालेल्या जागतिक गटासाठीच्या प्ले-ऑफ लढतीत भारताला कॅनडाविरुद्ध 2-3 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यंदाच्या नव्या मोसमात भारताला पुन्हा आशिया-ओशनिया गटातून सुरुवात करावी लागली आहे.

नव्या मोसमात अग्रमानांकन असलेल्या भारतीय संघाला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या फेरीत भारताला प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर खेळावे लागणार आहे. परिणामी येत्या 6 ते 7 एप्रिल दरम्यान होणाऱ्या लढतीत भारताला चीनमधील तियानजिन येथे खेळावे लागणार आहे. भारत व चीन यांच्यात अखेरची लढत 2005 मध्ये झाली होती. परंतु चीनविरुद्ध भारताची आकडेवारी 3 विजय व शून्य पराभव अशी प्रभावी आहे.

भारतीय संघातील अन्य खेळाडू रामकुमार रामनाथन व सुमित नागल एकेरीसाठी असून दुहेरीत लिअँडर पेस व रोहन बोपण्णा भारताचे आव्हान सांभाळतील. गेल्या काही दिवसांत मानांकित खेळाडूंविरुद्ध सनसनाटी विजयांची नोंद करणाऱ्या युकीच्या माघारीमुळे भारतीय संघाला निश्‍चितपणे हादरा बसला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)