“डेला ऍडव्हेंचर’च्या सहकार्याने जिल्हा परिषेद शाळेला सभागृह

हृदय रोगतज्ज्ञ डॉ. नीतू मांडके यांच्या स्मरणार्थ उपक्रम

कार्ला – कुणेनामा लोणावळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला स्वर्गीय हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नीतु मांडके यांच्या स्मरणार्थ व डेला ऍडवेंचर रिसोटच्या सौजन्याने सभागृह बांधण्यात आले. त्याचे उद्‌घाटन मावळचे आमदार संजय भेगडे, डेलाच्या सनाया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या वेळी मावळ सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम, पंचायत समिती सदस्य महादु उघडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गुंड, सरंपच संदीप उंबरे, उपसरपंच संजय ढाकोळ, माजी सरंपच सुवर्णा पांडवे, अंजना खांडगे, अर्जुन पाठारे, गणेश धानिविले, डेला समूहाचे जमील चौहान, श्रीमती पल, शालेय समितीचे सुधीर गोजे उपस्थित होते.

या वेळी आमदार संजय भेगडे यांनी जिल्हा परिषद शाळेत असणाऱ्या आधुनिक सुविधा व लोक सहभागाबद्दल शाळेचे कौतुक करुन मावळातील अन्य शाळांनी याचे मॉडेल शाळा म्हणून आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. तसेच उढेवाडीच्या सरंपच प्रगती वरे व उपसरपंच स्वाती येवले यांच्या मागणीनुसार कुणेनामा ते जांभळी फाटा रस्त्यासाठी 50 लाखाचा निधी जाहीर केला.

तसेच डेला समूह शाळेसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती रोहित जोशी यांनी देऊन यावर्षी शाळेचे स्नेहसंमेलन डेला रिसोटमध्ये करण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरंपच संदीप उंबरे यांनी केले. सूत्रसंचालन महादू मानकर यांनी केले. उपसरपंच संजय ढाकोळ यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)