राम रहीमला बाबाला 2 बलात्कार प्रकरणी 20 वर्षांचा कारावास

चंदिगड – डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला 2002 मधील 2 साध्वी बलात्कार प्रकरणी दहा अधिक दहा अशी 2 बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर दोन्हा पीडितांना प्रत्येकी 15 लाख रूपये नुकसान भरपाई म्हणजेच 30 लाख रूपयांची भरपाई देण्याचे आदेश देत कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंग यांनी ही शिक्षा ठोठावली. सुरक्षेच्या कारणास्तव कारागृहात जावून न्याधीशांनी ही शिक्षा सुनावली आहे. राम रहीमवर बलात्कार (कलम 376), धमकावणे (कलम 506) आणि कलम 511 अन्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सुत्रांकडून सर्वप्रथम 10 वर्षांची शिक्षा मिळाल्याची माहिती मिळाली होती. मात्र, प्रत्यक्षात 2 बलात्कार प्रकरणामध्ये प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे राम रहिमला एकुण 20 वर्षांची शिक्षा सीबीआयच्या न्यायालयाने सुनावली आहे.

राम रहिमला शिक्षा देण्यापुर्वी न्यायाधीश जगदीप सिंग यांनी दोन्ही पक्षांना युक्तीवादासाठी दहा-दहा मिनिटांचा वेळ दिला होता. त्यानंतर बाबा राम रहीमला कोर्टरुममध्ये बोलावण्यात आलं. यावेळी कोर्टरुममध्ये सीबीआयचे दोघे जण, बचाव पक्षातर्फे तिघे जण, दोन स्टाफ सदस्य आणि न्यायाधीश जगदीप सिंह उपस्थित होते. दरम्यान यावेळी बाबा राम रहीमने न्यायाधीशांकडे दयेची याचना केली. कोर्टरुममध्ये बाबा राम रहीम हात जोडून उभा राहिला होता. त्यावेळी बाबाला रडू कोसळलं.

राम रहीम समाजसेवक आहे, त्यांना कमीत कमी शिक्षा द्या, अशी मागणी त्याच्या वकिलांनी न्यायाधीशांकडे केली. आम्ही लोकांच्या भल्यासाठी काम केलं, स्वच्छता मोहीम, रक्तदान यासारख्या समाजसेवी योजना राबवल्या, अशा कामांचा उल्लेख करत राम रहीमला माफ करण्याची विनवणीही वकिलांनी कोर्टाकडे केली. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश जगदीप सिंग यांनी निकालाचं वाचन सुरु केलं. साध्वीवरील बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा कोर्टाने सुनावली.

शिक्षा सुनावल्यानंतर राम रहिम कोर्टातील जमिनीवर बसून रडत बसला होता. जेल वॉर्डन आणि स्टाफने त्याला चापट मारुन उठवले. राम रहीमच्या वैद्यकीय तपासणीत प्रकृती सामान्य असल्याचा अहवाल आला. त्यानंतर राम रहीमला जेलमध्ये नेण्यात आलं. बाबाला कैद्यांचा युनिफॉर्म देऊन जेलमधील कोणत्या सेलमध्ये त्याची रवानगी करायची, हे ठरवण्यात येईल.

दरम्यान, बाबा राम रहीमला शिक्षा सुनावण्यापूर्वीच हरियाणातील सिरसामध्ये डेरा समर्थकांची गुंडगिरी पाहायला मिळाली. सिरसामध्ये काही जणांनी दोन गाड्या पेटवल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)