डेरा प्रमुख राम रहीम बनले रोहतक तुरुंगात कैदी नंबर ‘1997’

चंदीगड (पंजाब-हरियाणा) – डेरा सच्चा सौदा प्रमुख रहीम सिंग हे रोहतक येथील सुनारीया तुरुंगात कैदी नंबर 1997 बनले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 2002 च्या बलात्कार प्रकरणात दोषी असल्याचा निर्णय विशेष सीबीआय न्यायालयाने दिल्यानंतर राम रहीम यांना एकमेव ऍप्रूव्हल सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

12 कैदी ठेवण्याची क्षमता असलेल्या या सेलमध्ये राम रहीम यांना एकांतवासात ठेवण्यात आले असून त्यांचा कैदी नंबर 1997 , असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तुरुंगातील पहिल्या रात्री राम रहीम मध्यरात्रीपर्यंत फेऱ्या मारत होते. तुरुंगात आल्यानंतर राम रहीम यांनी बरे वाटत नसल्याची तक्रार केली, पण डॉक्‍टरांनी तपासणी करून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा रिपोर्ट दिला.

राम रहीम यांना तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणेच वागवण्यात येत असून कोणतीही विशेष सवलत देण्यात येत नसल्याची माहिती हरियाणा डीजीपी (जेल) के पी सिंग यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)